
व्यक्तिमत्व विकास शिबीर
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-02-20सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये 'व्यक्तिमत्व विकास शिबीर 'कार्यक्रम संपन्न 💐 श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये विद्यार्थ्यांसाठी **व्यक्तिमत्व विकास शिबीर **घेण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे व्यक्ते म्हणून P & G चे District मॅनेजर & Trainer सूरज जवळेकर आणि आकाश साठे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सूरज जवळेकर म्हणाले आपल्या जीवनामध्ये व्यक्तिमत्वाला खूप महत्व आहे. तसेच करियरलाही खूप महत्व आहे.त्यासाठी स्वतःमध्ये बदल करणे खूप आवश्यक आहे.चांगली नोकरी मिळवणे हे आपलें ध्येय असायला हवे. या साठी आपण इंटरव्हूव कसा द्यावा? त्यासाठी तयारी कोणती करावी? स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा? याबद्दल सविस्तर माहिती दिली.प्रत्येकानी आपले करियर घडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. यावेळी कॉलेज च्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली,नॉन अकेडेमिक इन्चार्ज श्री. संजय बाबर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. प्रणाली कदम हिने केले.आभार प्रदर्शन विभाग प्रमुख श्री.प्रकाश कारकल यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री. भारत साबळे,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यावेळी सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.